Posts

Showing posts from January, 2024

क्रोध का परिणाम और दूर करने के उपाय

 अध्याय 2 श्लोक 56 दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥ जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्हासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यंापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तात्पर्य तात्पर्य : मुनि शब्द दर्शवितो की,जो मानसिक तर्कवितर्कासाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. असे सांगितले जाते की, प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोण असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. न चासावृषिर्यस्य मतं न भिन्नम् (महाभारत, वनपर्व 313.117) पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी: मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. स्थितधी: मुनी हा नेहमी कृष्णभावनाभावित असतो कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो.त्याल प्रशान्त नि:शेष मनोरथान्तर(स्तोत्र रत्न 43) असे म्हटले जाते. म्हणजेच ज्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व